Wednesday, April 16, 2025
Latest:
करमाळाकृषी

बोगस बियाणे संदर्भात राजुरीच्या सरपंचाची तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार


करमाळा प्रतिनिधी संजय साखरे               यंदाच्या खरीप हंगामात नामांकित कंपनीचे बियाणे शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणावर खरेदी केले. पण त्याची उगवण झालीच नाही. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला.
उधार व उसनवारी करून विकत घेतलेलं बियाणे वाया गेले आहे. या संदर्भातील प्रकार राजुरी गावातील शेतकऱ्यांच्या बाबतीत घडला आहे.येथील शेतकऱ्यांनी कांदा व बाजरी चे नामांकित कंपनीचे बियाणे खरेदी केले मात्र ते उगवलेच नाही. जवळ जवळ 15 ते 20 शेतकऱ्यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. यासंदर्भात राजुरीचे सरपंच डॉ. अमोल दुरंदे  यांनी तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. ज्या शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही अशा शेतकऱ्यांचा सर्व्ह करून त्याला जबाबदार असण्याऱ्या कंपनी वर गुन्हे दाखल करा  संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या ,अशी मागणी सरपंच डॉ. अमोल दुरंदे यांनी केली आहे.                                            मी नामांकित कंपनीचे कांदा बियाणे खरेदी केले होते पण ते उगवले नाही .यासंदर्भात योग्य ती दखल घेऊन संबंधित कंपनी वर गुन्हा दाखल करून मला झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी.
बापूसाहेब टापरे ,शेतकरी, राजुरी.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group