नवीन ठिकाणी प्रशासकीय इमारत उभी करावी.. मनसे अध्यक्ष नानासाहेब मोरे..
.
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यामध्ये तहसील कार्यालयाची नवीन प्रशासक इमारत करमाळा शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर जात असल्याने शहरातील व तालुक्यातील सामाजिक संघटनांनी तसेच सर्व राजकीय आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी या प्रशासकीय इमारतीला विरोध केला आहे अशातच मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले करमाळा तहसील कार्यालयाची इमारत शहरापासून दूर गेल्यावर या शहराचा विकास होईल मोठी बाजारपेठ वाढेल एमआयडीसीचा भौगोलिक भाग वाढेल या दृष्टीतून नवीन जागेमध्ये इमारत होणे गरजेचे आहे असे समर्थन मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी केले आहे..
