करमाळा शहरात19 ऑगस्ट रोजी 17 पाॅझिटिव्ह ग्रामीण भागात 6 पाॅझिटीव्ह एकुण कोरोना बाधितांची संख्या 373.

करमाळा प्रतिनिधी. करमाळा शहर व तालुक्यात 19 ऑगस्ट रोजी 166 ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. त्यात 21 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असताना करमाळा शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. करमाळा शहरात 58 ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये तब्बल 17 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तर ग्रामीण भागात 108 ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या असून यात 6 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यातील दोघे बाहेरगावचे आहेत. आज 10 जणांना डिस्चार्ज दिला असून आजपर्यंत 235 कोरोनाबाधीत रुग्ण बरे होवून घरी सोडले आहे. करमाळा तालुक्यात आजपर्यंत 6 कोरोनाबाधीतांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सध्या 131 जणांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे करमाळा तालुक्यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 373 वर जावून पोहोचली आहे. करमाळा शहरात सध्या प्रचंड गर्दी होत असून अशाच प्रकारची गर्दी कायम राहिली तर कोरोनाबाधितांच्या संख्येत दुपटीने वाढ होईल त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य काळजी घेणे गरजेचे आहे, नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन तहसीलदार समीर माने ,मुख्याधिकारी विणाताई पवार पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी केले आहे.
