वेणु व्यंकटेशा चॅरीटेबल ट्रस्ट रावगाव कालिंदा फाउंडेशन रावगाव यांच्यावतीने पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय रावगाव येथे वही पेन वाटपचा कार्यक्रम संपन्न
करमाळा प्रतिनिधी पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय रावगाव ता. करमाळा. या विद्यालयात शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी वह्या वाटण्याचा कार्यक्रम पार पडला.
वेणु व्यंकटेशा चॅरीटेबल ट्रस्ट रावगाव व कालिंदा फाउंडेशन रावगाव यांच्या वतीने वही वाटप व पेन वाटपचा कार्यक्रम पार पाडला. यावेळी श्री अनिल पवार ग्रामपंचायत सदस्य रावगाव , रावसाहेब जाधव,लखन पवार, अक्षय पवार यांच्या हस्ते पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रताप बरडे सर यांनी केले व आभाराचा कार्यक्रम प्रशालेचे मुख्याध्यापक श्री कोळेकर सर यांनी केले यावेळी विद्यालयाचे सर्व विद्यार्थी सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते..
