करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा आधारवड असणाऱ्या श्री. आदिनाथ कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देऊ-विलासराव घुमरे सर
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा आधारवड असणाऱ्या श्री. आदिनाथ कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देऊ असे मत विद्या विकास मंडळाचे सचिव आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे प्रशासकीय संचालक विलासराव घुमरे सर यांनी व्यक्त केले.
श्री. अदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय संचालकपदी मा. श्री. विलासरावजी घुमरे (सर) यांची नियुक्ती झाल्याबद्दल यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व यशवंत परिवार, करमाळा तसेच महाविद्यालयातील बी. कॉम. भाग-3 च्या विद्यार्थिनींच्या वतीने सरांचा सत्कार महाविद्यालयाच्या ‘विजयश्री’ सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभप्रसंगी माझ्या प्रशासकीय कामकाजांमध्ये श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करेल असे सांगितले. या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक या मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी प्रा. लक्ष्मण राख, प्रा. हनुमंत भोंग, प्रा. अभिमन्यू माने, प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांनी मनोगत व्यक्त केले व पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी यशवंत परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ विभागातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा. प्रदीप मोहिते यांनी केले व आभार प्रा. मुन्नेश जाधव यांनी मानले.
