रंगपंचमीला कपडे फाडून अर्धनग्न अवस्थेत नाचणे ही एक विकृती

करमाळा प्रतिनिधी :- रंगपंचमी हा सण लहान मुलांपासून ते थो-या मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा सण म्हणून ओळखला जातो. या सणा दिवशी सर्व वयोगटातील मंडळी एकत्र येत एकमेकांना विविध प्रकारचे रंग लावून, पारंपारिक वाद्य वाजवून तसेच आधुनिक पद्धतीने डीजे लावून नृत्य करीत पुढील आयुष्य विविध रंगानी समृद्ध व्हावे म्हणून शुभेच्छा देत असतात. परंतु आजकालच्या तरुण पिढी मात्र या चांगल्या सणाला कपडे फाडून, अश्लील हावभाव करून, व्यसनाच्या अधीन होऊन गालबोट लावताना ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यामुळे महिला भगिनींना हा सण मात्र त्रासदायक वाटायला लागला आहे. कपडे फाडून अर्धनग्न अवस्थेत नाचणे म्हणजे ही एक मानसिक विकृतीच म्हणावी लागेल. यापुढील पिढ्यांना सणाचे महत्व कधी समजेल याची चिंता मागील पिढीला भेडसावत आहे.


