आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सर्वाधिक 272 अर्ज मंजूर निवडणूक चुरशीची होणार
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात प्रथमच आजिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सर्वाधिक 272 अर्ज आले होते ते सर्व अर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे आजिनाथ कारखान्याची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या २७२ उमेदवारांचे सर्व अर्ज मंजूर झाले आहेत. त निवडणूक निर्णय अधिकारी अमोलसिंह भोसले व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सौ शिल्पाताई ठोकडे यांनी मंगळवारी अर्जांची छानणी केली.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी २७२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्याची सुनावणी तहसील कार्यालयाच्या आवारात सकाळी ११ वाजता झाली. ऊस गाळपाची अट शिथिल झाल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला. अर्जांवर कोणीही आक्षेप घेतले नाहीत. मात्र माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे सुजित बागल व शारदा मोरे यांच्या सहकारी संस्था व बिगर ऊस उत्पादक गटातील अर्जांवर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर त्याची निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर सुनावणी झाली. यामध्ये दोन्ही बाजूंच्या वकिलांनी म्हणणं सादर केले त्यानुसार दोन्ही अर्ज मंजूर झाले आहे.
या निवडणुकीत आमदार नारायण आबा पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, बागल गटाचे माजी अध्यक्ष धंनजय डोंगरे, बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजी बंडगर, ,माजी उपसभापती चिंतामणी जगताप, शंभूराजे जगताप, संतोष पाटील, अभिजीत पाटील,संतोष वारे, पांडुरंग जाधव,डा.केवारे सुहास गलांडे, डॉ पुंडे, चंद्रकांत सरडे, प्रा. रामदास झोळ, दशरथ कांबळे, रमेश कांबळे महेश चिवटे गणेश चिवटे आदींचे अर्ज दाखल असून सर्व अर्ज मंजूर झाले आहेत. आदिनाथ कारखान्याची निवडणूक सर्वाधिक अर्ज मंजूर झाल्यामुळे अटीतटीची होणार आहे.
