Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळा

सोलापूर जिल्हाचा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार धर्मवीर संभाजी विद्यालयाचे क्रिडा शिक्षक इंद्रजित मुळीक सर यांना प्रदान

करमाळा प्रतिनिधी सोलापूर जिल्हाचा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार धर्मवीर संभाजी विद्यालय गौंडरे ता-करमाळा जि-सोलापुर येथील क्रीडा शिक्षक इंद्रजित चंद्रभान मुळीक सर यांना मिळाला आहे.मुळीक सर यांनी आपल्या पंचवीस वर्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात नावारूपाला आनले.तालुका स्तरावर कबड्डी,खो-खो, कुस्ती, लांब उडी, भालाफेक,धावणे,या आशा अनेक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करत.तालुका स्तर, जिल्हा स्तरावर तसेच राज्य पातळीवर जाऊन त्यांनी धर्मवीर संभाजी विद्यालयाचे नाव उंचावले. क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे पंचक्रोशीतील विद्यार्थी, पालक यांचेकडून कौतुक होत आहे.शाळेचे मुख्याध्यापक बापूसाहेब नीळ सर, सचिव हरीदास काळे सर, जेष्ठ शिक्षक यशवंत कोळेकर सर,वैजिनाथ भोईटे, सुखदेव गिलबीले, अशोक जावळे, संतोष पुराने, उत्तम हनपुडे सर तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मुळीक सर यांचे अभिनंदन केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!