करमाळा नगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी श्री.अरुण शहा यांचे दुःखद निधन
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील कुंकू गल्ली येथील रहिवासी ज्येष्ठ नागरिक आणि नगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी, श्री.अरुण शहा यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 79 होते. त्यांच्या मागे पत्नी दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे. कृषी अधिकारी अतुल शहा करमाळा नगरपरिषदेचे कर्मचारी भूषण शहा यांचे ते वडील होते. करमाळा येथे हिंदु भूमी अमरधाम येथे त्यांच्यावर दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. मनमिळाऊ प्रेमळ शांत हसतमुख स्वभावाचे अंकल नावाने परिचित होते. त्यांच्या अंत्यसंस्काराला शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
