करमाळा

शेलगाव क च्या सरपंच पदी सौ.यमुना वीर व उपसरपंचपदी लखन ढावरे यांची बिनविरोध निवड… निवडीनंतर आमदार संजयमामा शिंदे यांचे हस्ते सत्कार

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील मौजे शेलगाव क च्या सरपंच पदी सौ.यमुना आत्माराम वीर व उपसरपंचपदी श्री लखन विश्वनाथ ढावरे यांची दि.15 सप्टेंबर रोजी बिनविरोध निवड झाल्याबद्दल करमाळा तालुक्याचे विकासप्रिय आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते आमदार संजयमामा शिंदे संपर्क कार्यालय करमाळा येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव दादा माळी, वाशिंबे गावचे सरपंच तानाजी झोळ शेलगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच अशोक काटुळे ,माजी उपसरपंच सौ.कविता वीर, यांचेसह ग्रामपंचायत सदस्य धर्मराज शिंदे, सौ.रेश्मा कुकडे व सौ.सुलोचना जगताप तसेच सोनाली दास, विठाबाई तोरडमल, माजी उपसरपंच सचिन पाटील, सचिन वीर, राहुल कुकडे, सुभाष पायघन ,शिवलिंग माने, सोसायटीचे चेअरमन गणेश जाधव, भुजंग वीर, माजी सरपंच आत्माराम वीर ,प्रकाश ढावरे, आजिनाथ वीर, संदीप पाटील ,बापू माने, सुनील माने, युवा नेते केशव दास , दत्तात्रय वीर, आ. संजयमामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक डॉ. विकास वीर आदी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group