रेल्वे उपभोक्ता समितीचे सल्लागार सदस्य दीपक चव्हाण यांचे कडून पाहणी पारेवाडीतील राहिलेल्या बोगद्याचे काम करून बोगदात चालू करून देण्याची मागणी.
केतुर प्रतिनिधी सध्या पारेवाडी येथील नवीन बोगद्याचे काम चालू असून काम पूर्ण होण्याच्या अगोदरच येथील रेल्वेचे गेट बंद केल्याने केतुर दोन ,पोमलवाडी, केतुर एक, पारेवाडी, हिंगणी, दिवेगव्हाण आदी गावातील विद्यार्थी आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या 30 जुलै पासून हे गेट बंद केल्याने आणि बोगद्याचेही काम अपूर्ण असल्याने या गावातील व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी यांचे अपरिमित नुकसान होत आहे म्हणून आणि हा बोगदा लवकर चालू करण्यासाठी आज क्षेत्रीय रेल्वे उपभोक्ता समितीचे सल्लागार सदस्य दीपक चव्हाण यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली यावेळी त्यांच्या समवेत संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य नरेंद्र सिंह ठाकूर , केतूरचे माजी सरपंच अजित विघ्ने , राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील , भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती विभागाचे संघटन सरचिटणीस सचिन खराडे आदी उपस्थित होते .यावेळी त्यांनी दौंड विभागाचे वरिष्ठ सेक्शन इंजिनिअर अजय चौबे यांची भेट घेऊन काम लवकरात लवकर पूर्ण करून वाहतूक सुरू करावी अशी मागणी केली. यावेळी चौबे यांनी मी या ठिकाणी प्रत्यक्ष थांबूनच काम पूर्ण करून घेतो असे आश्वासन दिले बहुतेक उद्या दुपारपर्यंत या ठिकाणची वाहतूक हिंगणी मार्गे सुरु होईल अशी शक्यता आहे.दीपक चव्हाण यांनी या ठिकाणी भेट देऊन वरिष्ठांची संपर्क साधून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली असल्याने या भागातील ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक होत आहे.