22 तारखेला प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठाच्या निमित्ताने मुस्लीम समाजाने मटन मासे मद्याचे दुकान बंद ठेवुन श्रीरामाचे स्वागत करण्याचे डाॅ एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशनचे आवाहन
करमाळा प्रतिनिधी 22 तारखेला प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठाच्या निमित्ताने मुस्लीम समाज ने व इतर बांधव जे मटण ,चिकन, मासे विक्री करणारे व दारु व वाईन शॉप दुकाने बंद ठेवून या सोहळ्याला सहकार्य करावे असे नम्र आवाहन भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समीर शेख यांच्या वतीने करण्यात येत आहे. प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त सर्व भारतीय समाजातील नागरिकांनी उत्सवात सहभागी होऊनकरमाळ्यात 22 जानेवारीला प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त करमाळा शहरातील मटण व चिकन , मासे विक्री दुकाने व दारु , वाईन शॉप, परमिट रूम बिअर बार असे सर्व व्यवहार बंद करून प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त प्रशासनाला व आनंद सोहळास सहकार्य करावे जेणेकरून कोणतेही गालबोट न लागता निर्विघ्नपणे पार पडला जावा असे आवाहन भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा यांच्या वतीने करण्यात येत आहे.
