दत्तकलेच्या विद्यार्थ्यांची कृषी विज्ञान प्रदर्शनास भेट
करमाळा प्रतिनिधी दत्तकलेच्या विद्यार्थ्यांची ‘ कृषी विज्ञान प्रदर्शनास भेट दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तसेच दत्तकला आयडीयल स्कूल केत्तुर च्या इ.११वी आणि १२वी मधील विद्यार्थ्यांची कृषी विज्ञान केंद्र, माळेगाव कॉलनी ,ता. बारामती येथे अभ्यास पूरक क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. 20 जानेवारी रोजी अग्रिकलचरल डेवलपमेंट ट्रस्ट,मालेगाव कॉलनी आयोजित कृषी विज्ञान प्रदर्शन दिनांक १९ जानेवारी पासून सुरू झाले आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यामध्ये ‘शेती एक व्यवसाय’ हा दृष्टिकोन विकसित व्हावा,तसेच शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती त्यांना मिळावी, या उद्दशाने ही क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती.
सुमारे 170 एकराच्या विस्तीर्ण परिसरात या कृषिकचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, आयओटी, प्रिसिसीअन अॅग्रीकल्चरल, व्हर्टिकल फार्मिंग, ग्रामीण शेतकरी, रोबोटचा कृषी क्षेत्रात वापर, दुग्ध आणि फळप्रक्रिया क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, क्लायमेट स्मार्ट अॅग्रीकल्चर प्रॅक्टिसेस, दूध आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग, मिलेट दालन असे अनेक उपक्रम विद्यार्थ्यांनी पहिले व त्या बाबत माहिती घेतली.
या क्षेत्रभेटीसाठी आम्हाला दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. रामदास झोळ सर, उपाध्यक्ष मा. राणादादा सूर्यवंशी साहेब, सचिव सौ. माया झोळ मॅडम प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर सर, डायरेक्टर ऑफ स्कूल सौ. ताटे मॅडम, जूनियर कॉलेजच्या प्राचार्या सौ यादव मॅडम* *यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले व त्यांनी या भेटीसाठी प्रोत्साहन दिले. सदर क्षेत्र भेट आदरणीय ताटे मॅडम, मारकड सर,धेंडे सर , खाडे मॅडम यांच्या उपस्थितीत व्यवस्थित पार पडली.
