करमाळ्याचा सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक अनुशेष लवकरच भरून काढणार -प्रा.रामदास झोळ*
*
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात शालेय शिक्षण घेतल्यानंतर व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. तालुक्यामध्ये हा शैक्षणिक अनुशेष खूप मोठा आहे. या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज फार्मसी कॉलेज बीबीए बीसीए एमबीए एमसीए अशा विविध प्रकारचे व्यावसायिक कोर्स असणारी महाविद्यालये नाहीत.
करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांना दहावी बारावी पास झाल्यानंतर इतर शहरांमध्ये शिक्षणासाठी जावं लागत आहे त्या पाठीमागचे मूळ कारण म्हणजे करमाळा तालुक्यामध्ये कुठलाही व्यावसायिक अभ्यासक्रम असणारे कॉलेज नाही. त्यामुळे आम्ही देवळाली येथे नवीन शैक्षणिक संकुल उभारणार आहोत. त्यामध्ये सर्व प्रकारचे व्यवसायिक अभ्यासक्रम तसेच शालेय अभ्यासक्रम असणारे युनिट चालू करणार आहोत. जेणेकरून करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिक्षणासाठी जावे लागणार नाही.लवकरच या ठिकाणी दत्तकला शैक्षणिक संकुल उभा करून करमाळ्याचा शैक्षणिक अनुशेष भरून काढला जाईल. असे प्रतिपादन दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी केले.
शनिवार दिनांक 11 एप्रिल रोजी प्रा.रामदास झोळ यांचा वाढदिवस करमाळा येथील प्रा.रामदास झोळ फाउंडेशन संपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवर विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना प्रा.झोळ म्हणाले की, केतुर या ठिकाणीही डी फार्मसी हा कोर्स सुरू केला असून या ठिकाणी अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. करमाळा तालुक्यामध्ये चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले जात आहे. लवकरच देवळाली या ठिकाणी दत्तकला विद्यापीठ काढण्याचा आमचा मानस आहे. करमाळा तालुक्यामध्ये उच्च शैक्षणिक पात्रता असणारे विद्यार्थी कमी असल्याने आपण दत्तकला संस्थेत इतर राज्यातील शिक्षक भरले आहेत. आणखी 25 ते 30 जागा शिल्लक आहेत तरी करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उच्च दर्जाचे शिक्षण घ्यावे त्यांना दत्तकलाच्या माध्यमातून रोजगार मिळवून दिला जाईल.
यावेळी मकाई कारखान्याचे मा. चेअरमन दिग्विजय बागल,करमाळा नगरीचे नगराध्यक्ष संजय सावंत,भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे,आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक नवनाथ बापू झोळ, करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी,मकाई चे मा. संचालक हरिभाऊ झिंजाडे, श्री. बोधे गुरुजी,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीभाऊ पाटील, सत्यवान गायकवाड, सिद्धेश्वर घुगे,माजी प्राचार्य जयप्रकाश बिले,युवराज बिले,भाजपचे शशिकांत पवार, संजय घोरपडे,अमोल पवार, नरेंद्र ठाकूर, जितेश कटारिया, प्रितम सुरवसे,महादेव गोसावी, सुरेश शिंदे सारिका झोळ,दत्तात्रय कामटे, संदिप सरडे, बाबू मुलाणी, अमोल साळुंखे, राज झिंजाडे, संदिप नंदर्गे तसेच दत्तकला चे सर्व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन गोपीनाथ पाटील यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर शिंदे यांनी मानले.


