Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळा

करमाळा येथील श्रीराम मंदिराला डॉ एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशन मुस्लिम समाजाच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे सामाजिक एकतेचे करमाळयात अनोखे दर्शन

करमाळा प्रतिनिधी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा व सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने 17 जानेवारी रोजी श्रीराम मंदिर करमाळा* येथील पुरातन असे श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार करुन नवीन स्वरूपात बांधण्यात आले आहे . श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा दिनांक 22/01/2024 रोजी असुन या दिवसाचे औचित्य साधून या श्रीराम मंदिरासाठी करमाळा शहरातील सामाजिक सेवेत नेहमी अग्रभागी राहणारे *समीर शेख (मार्गदर्शक भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा व सकल मुस्लीम समाज करमाळा)* यांच्या वतीने फुल ना फुलाची पाकळी म्हणून व धार्मिक वातावरण, दोन्ही समाजातील लोकांत बंधुभाव, एकात्मता आणि प्रेम कायम टिकून राहण्यासाठी व सर्व समाजात एक चांगला संदेश जाईल यासाठी श्रीराम मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरेचे कीट एक सामाजिक योगदान म्हणून आमचे सर्वांचे मार्गदर्शक व जेष्ठ पत्रकार, प्रसिद्ध विधीतज्ञ ह.भ.प. श्री बाबुराव जी हिरडे साहेब यांच्या शुभहस्ते भेट देण्यात आले आहे. यावेळी श्रीराम मंदिर व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष विजय भाऊ देशपांडे, प्रसिद्ध व्यापारी राधेश्याम देवी, जेष्ठ नागरिक श्रीधर सुर्यपुजारी , प्रसिद्ध व्यापारी भारत शेठ वांगडे, दर्शन कुलकर्णी, विवेक देशपांडे, वीर साहेब व उपस्थित राम भक्त नागरिक मोठया प्रमाणात हजर होते या होणा-या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष आझादभाई शेख, जमीर सय्यद ( विश्वस्त अध्यक्ष जामा मस्जिद करमाळा ), जाहागीर बेग ( उपाध्यक्ष एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशन) , आलीम खान ( प्रसिद्ध व्यापारी , समाजसेवक ),दिशान भाईजी कबीर ( युवक नेते सकल मुस्लीम समाज करमाळा) व अनेक मुस्लीम बांधव उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन रमजान भाई ( पिंटू ) बेग ( सचिव डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन ) यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!