मकाई साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अमित केकान यांची माघार वांगी गट बिनविरोध बागल गटाचा विरोधकांना दे धक्का
करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये वांगी मतदारसंघ बिनविरोध झाला असून या गटातील बागल विरोधी गटाचे उमेदवार अमित केकान यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्यामुळे सचिन पिसाळ युवराज रोकडे या गटातील दोन्ही जागा बिनविरोध झाल्या आहेत बागल गटाच्या नेत्या रश्मी दीदी बागल युवा नेते दिग्विजय बागल त्यांच्या मध्यस्थीने विरोधी गटातील अमित केकान यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून वांगी गट बिनविरोध झाला आहे.तसेच भिलारवाडी येथील बाबुराव अंबोधरे यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतल्या असल्याने विरोधी गटाला धक्का देण्याचे काम बागल गटाने केले आहे.
