कुणबी मराठा नोंद असलेली मोडीलिपित असणारी करमाळा तालुक्यातील गावनिहाय यादी प्रशासनाने मराठीत प्रसिद्ध करण्याची संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुकडे यांची मागणी
करमाळा प्रतिनिधी कुणबी मराठा समाजाची कुणबी नोंद असलेली आडनाव गावनिहाय यादी प्रशासनाने जाहीर केली आहे ती यादी मोडी लिपीत असल्याने नागरिकांना समजण्यासाठी अडचण येत आहे त्यामुळे मोडी लिपीतून मराठी भाषांतर करून मराठीमध्ये यादी जाहीर करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुकडे यांनी केली आहे. बाबत अधिक बोलताना त्यांनी असे सांगितले की कुणबी मराठा समाजाचे गावनिहाय सर्वेक्षण शासनाकडून करण्यात आले असून गावनिहाय यादीही शासनामार्फत पीडीएफ स्वरूपात देण्यात आली आहेज ही यादी मोडी लिपी मध्ये असल्याने नागरिकांना आपल्या कुणबी ची नोंद समजत नाही त्यामुळे मोडी लिपी वाचकांकडून शहानिशा करून सरकारी अधिकाऱ्यांनी प्रामाणित स्वरूपात गावनिहाय आडनावानुसार मराठी मध्ये यादी प्रसिद्ध करावी तसेच त्या यादीचा गावानुसार फलक तहसील कार्यालयाच्या बोर्डवर लावा जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही. खऱ्या अर्थाने कुणबी मराठा असलेल्या मराठा समाजाला न्याय मिळेल व नागरिकांच्याही कुणबी नोंद असल्याच्या तकरींना आपणाला सामोरे जावे लागणार नाही. याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन कुणबी नोंद असलेले कुटुंब आडनाव गावनिहाय करमाळा शहराची यादी मराठीमध्ये प्रसिद्ध करण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुकडे यांनी केले आहे.
