Monday, April 21, 2025
Latest:
आरोग्यकरमाळा

23 फेब्रुवारी ते 2 मार्च रोजी फिटनेस कोच महेश‌ वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली समंतभद्र गुजर गल्ली करमाळा येथे फ्री फिटनेस शिबिराचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी 23 फेब्रुवारी ते 2 मार्च समंत भद्र गुजर गल्ली करमाळा येथे फ्री फिटनेस शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.Happy Mind Happy Health या संस्थेचे अध्यक्ष महेश वैद्य फिटनेस कोच मुंबई हे या फिटनेस शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत.हरीश जी लटूरे उद्योजक हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत…कोरोना महामारी नंतर शारीरिक व्यायाम चे महत्त्व लोकांना समजले आहे त्यासाठी योग्य व्यायाम आणि संतुलित आहार याची गरज आहे.त्यासाठी किमान 45 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे.ग्रामीण भागामध्ये याचा प्रसार व्हावा यासाठी हॅप्पी माईंड हॅप्पी हेल्थ चे अध्यक्ष फिटनेस ट्रेनर महेश वैद्य हे फिटनेस शिबिराचे आयोजन करीत आहेत…याचा लाभ सर्वांनी घ्यावा.जेणे करून आपले शरीर मजबूत फिट राहील .Happy mind Happy Health Mumbai आणि अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्था नाशिक शाखा करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.शरिराची रोग प्रतिकार शक्ती वडविण्यासाठी नित्य व्यायाम ची गरज आहे. व्यायाम हा प्रकार सर्वांना माहिती आहे पण तो कसा करावा किती वेळ करावा याची सांगड घालणं आवशयक आहे.त्यासाठी Happy mind Happy Health Mumbai चे अध्यक्ष फिटनेस कोच विक्रमवीर महेश वैद्य हे विविध ठिकाणी फिटनेस शिबिराचे आयोजन करीत आहेत.विशेषत: 10 ते 16 वयोगट आणि 40+ स्त्री आणि पुरूष यांच्या फिटनेस कडे लक्ष देणे आवश्यक आहे .गेली 25 वर्षे महेश वैद्य हे फिटनेस कोच म्हणून कार्यरत आहेत. आदरणीय विनोद कुमार गांधी हे महेश वैद्य यांचे गुरू आहेत. त्यांच्या मार्गदर्शनखाली महेश वैद्य यांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.7777 जोर (पुश अप्स ) साडेचार तास सतत मारण्याचा विक्रम प्रस्थापित केला…करमाळा नगरपरिषद तर्फे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी करमाळा नगरपरिदेच्या 125 वर्षे पूर्ण झाली या निमित्ताने करमाळा भूषण पुरस्कार तत्कालीन नगराध्यक्ष गिरिधरदास देवी यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला होता…सध्या स्त्री आणि पुरुषानं मध्ये अनेक प्रकारची व्याधी जडतात उदा.. मधुमेह , ब्लड प्रेशर स्नायू कमजोर होणे… चयापचय क्रिया मंदावणे शरिराची लवचिकता कमी होणे या प्रकारची लक्षणे दिसून येतात परिणामी रोगप्रतिकार शक्ती कमी होते.आनंदीचे  मालक बाळासाहेब होसिंग Aani भाऊसाहेब फुलारी, राजेंद्र जगताप कलासिक ऑईल कंपनी चे मालक संतोष कुलकर्णी , अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था चे सर्व सदस्य तसेचअखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था करमाळा महिला आघाडी व युवा आघाडी उद्योजक विनोद कुमार गांधी, संतोष कुलकर्णी सर महेश दोशी, मित्रवर्य किसन कांबळे सर संजय राजे घोरपडे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group