करमाळा

1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना 1982- 84 जुनी पेन्शन योजना लागू करण्यात व्हावी यासाठी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना निवेदन पाठवणार – तात्या जाधव

करमाळा प्रतिनिधी 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना 1982- 84 जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने आपल्या महाराष्ट्रातील नवनिर्वाचित 48 लोकसभेचे खासदार त्याचबरोबर राज्यसभेचे खासदार यांना पोस्टाने निवेदन पाठवण्याचे नियोजन केले आहे .                                       तरी सर्व मान्यवर खासदार साहेब ,मंत्री महोदय, सर्व पक्ष प्रमुख यांनी आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी ही विनंती सोलापूर जिल्हा जुनी पेंशन संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
1 नोव्हेंबर 2005 नंतर रूजू झालेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सध्या सुरू असलेली NPS योजना बंद करून नवीन GPS योजना लागू करण्याचा घाट शासनाने घातला आहे परंतु आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना जुनीच पेंशन योजना (OPS) सुरू झाली पाहिजे त्यामुळे ही निवेदने पोस्टाने नूतन खासदार साहेब यांना पाठवली आहेत जेणेकरून पेंशन चा आवाज संसदेत उठवला जाईल अशी माहिती सोलापूर जिल्हा जुनी पेंशन संघटनेचे जिल्हा नेते श्री तात्यासाहेब जाधव यांनी दिली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group