महाशिवरात्रीनिमित्त तीर्थक्षेत्र संगोबा येथे पोथरे येथील शिवरत्न मित्र मंडळाच्यावतीने आलेल्या भाविकांसाठी मोफत चहा थंड पिण्याचे पाणी वाटप
करमाळा प्रतिनिधी महाशिवरात्रीनिमित्त तीर्थक्षेत्र संगोबा येथे पोथरे येथील शिवरत्न मित्र मंडळाच्या वतीने आलेल्या भाविकांसाठी मोफत चहा व थंड पिण्याचे पाणी देण्यात आले. शिवरात्रीनिमित्त भाविकांची सेवा घडावी या उद्देशाने आपण हा उपक्रम राबवला असल्याची माहिती मित्र मंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र झिंजाडे यांनी दिली.
करमाळा तालुक्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रापैकी संगोबा येथील आदिनाथ मंदिर हे एक प्रमुख मंदिर आहे या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते यात्रेसाठी करमाळ्यासह जामखेड कर्जत परांडा माढा या तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने येतात. या भावी भक्तांची सेवा घडावी व त्यांची सोय व्हावी या उद्देशाने शिवरत्न मित्र मंडळाने मोफत चहा व शुद्ध थंड पाण्याच्या स्टॉल लावून आलेल्या भाविकांची सेवा केली आहे. या ठिकाणी भाविकांसह कमाई कारखान्याचे चेअरमन व बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल, बाजार समितीचे सभापती शिवाजीराव बंडगर, उपसभापती चिंतामणी जगताप, पांगरेचे माजी उपसरपंच सचिन पिसाळ, मकाई चे माजी संचालक प्रताप बरडे, आदिनाथचे माजी संचालक दिनेश भांडवलकर, चंद्रशेखर जोगळेकर सह विविध मंडळींनी या ठिकाणी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. दोन दिवस आलेल्या भाविकांना चहा व पाणी देण्यासाठी अमोल साळुंके, आबासाहेब चव्हाण, अशोक उद्धव जाधव यांनी परिश्रम घेतले. तर मंडप व्यवस्था दिलीप शिरगिरे यांनी केली.
