जनतेची सदैव सेवावृत्तीने काम करणारे संतोष वारे यांचे कार्य कौतुकास्पद -आमदार निलेश लंके
करमाळा प्रतिनिधी. जनतेची तळमळ असणारे लोककल्याणासाठी सेवावृत्तीनै काम करणारे कोरोनाकाळामध्ये संतोष वारे यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे असे मत राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले.सरकार मित्र मंडळाच्यावतीने संतोष वारे यांच्या वाढदिवसानिम्मित सत्कार कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की वडीलाचे निधन झाल्यानंतर स्वतःचे दुःख बाजुला सारुन कोव्हीड सेंटर उभा करून अनेकांचे जीव वाचवण्याचे काम केले असुन जनतेचे पाठबळ व आशिर्वाद नक्कीच त्यांच्या पाठीशी असुन त्यांची भविष्यातील राजकिय वाटचाल उज्वल असुन त्यांच्या कार्यासाठी माझा सदैव पाठींबा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करमाळा तालुका अध्यक्ष संतोष वारे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचे हस्ते त्यांचा सरकार मित्र मंडळा तर्फे वाढदिवस साजरा करून जय महाराष्ट्र चौकात सत्कार करण्यात आला.
यावेळी मोठ्या संख्येने युवकांची उपस्थिती होती. श्री. वारे यांचे वाढदिवसानिमित्त सरकार मित्र मंडळाने आमदार लंके यांना आमंत्रित केले होते. वारे हे सरकार मंडळाचे सदस्य आहेत. लंके यांची महात्मा गांधी पुतळ्यापासून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे वेगळेच जल्लोषमय वातावरण तयार झाले होते. लंके यांचे हस्ते सरकार मित्र मंडळाची गणपतीची आरती करण्यात आली. त्यानंतर जय महाराष्ट्र चौकात केक कापून वारे यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी लंके यांनी वारे यांच्या सामाजिक कार्याचे कौतूक करून भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.आमदार श्री.लंके यांनी सावंत गटाचे नेते सुनील सावंत, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप यांचे घरी भेट देवून गणपतीचे दर्शन घेतले. रात्री संतोष वारे यांचे घरी भोजन घेतले. या कार्यक्रमास युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व कार्यक्रमाने वारे यांची हवा झाल्याची चर्चा आहे.
