केम येथे दोन डबे रेल्वे ट्रॅक सोडून अचानक घसरल्यामुळे रेल्वे वाहतुक खोळबंली होती आता वाहतुक सुरळीतपणे चालु
करमाळा प्रतिनिधी केम (ता. करमाळा) येथील एका लुपलाईन ट्रॅक वरील रेल्वेचे दोन्ही इंजिन व दोन डबे रेल्वे ट्रॅक सोडून अचानक घसरले, त्यामुळे काहीवेळ रेल्वेलाईन बंद होती. रेल्वे अचानक घसरल्याने रेल्वेचे दोन्ही इंजिन थेट केम येथील शेतकरी रवी खाणट यांच्या शेतात गेली
सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नसून रेल्वे रुळाचे मात्र नुकसान झाले. सोलापूर- पुणे हा दुहेरी रेल्वे ट्रॅक असून या ट्रॅक वरील एका ट्रॅकवरुन जाणारी रेल्वे काल (ता. ३) रात्री केम जवळ घसरली व खाली गेली, परंतु रेल्वे विभागाने आज पहाटे ३ वाजता तातडीने यंत्रणा सज्ज करून क्रेनद्वारे हे रेल्वेचे दोन्ही इंजिन पुन्हा रेल्वे ट्रॅकवर लावून पूर्ववत करण्याचे काम चालू आहे.यासाठी 3 ते 4 दिवस लागू शकतात.परंतुकाही वेळ एक रेल्वे ट्रॅक बंद होता त्यामुळे ठराविक गाड्यांच्या वेळेत बदल झाला होता. घटनास्थळी रेल्वे पोलीस बंदोबस्त ठेवला ही घटना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती ही गाडी लुपलाईनवर असल्याने रेल्वे लाईन सुरळीत पणे सुरू आहे.
