अपात्र अर्जावर उच्च न्यायालयाने दिलासा दिला असून 14 उमेदवाराची 9 जूनला करमाळ्यात पुन्हा सुनावणी होणार- प्रा.रामदास झोळ
करमाळा प्रतिनिधी मकाई निवडणुकीत अपात्र ठरवण्यात आलेल्या १४ उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आला असून यामध्ये आम्हाला दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयामध्ये मी दाखल केलेल्या रीट याचिकांवरती माननीय न्यायाधीश यांनी असे आदेश पारित केलेले आहेत की रिटर्निंग ऑफिसरने ज्या कारणाने अर्ज नामंजूर केलेले आहेत त्या कारणाविषयी अर्जदाराला कारखान्याच्या उपविधी प्रमाणे त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही.तसेच याबाबत अर्जदारांनी रिटर्निंग ऑफिसर च्या समोर ९ जुन रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहून आपले म्हणणे मांडण्याची संधी दिलेली आहे. त्याचबरोबर संबंधित रिटर्निंग ऑफिसरने सुधारित आदेश पारित करावेत असेही आदेश दिले आहेत आणि त्या सुधारित आदेशानुसार पुढची कार्यवाही करावी असे सांगितले आहे. त्याचबरोबर जर आम्हाला रिटर्निंग ऑफिसर चे म्हणणे मान्य नसेल तर पुढील प्रक्रियेसाठी आम्हाला पुन्हा संधी उच्च न्यायालयाने आम्हाला दिलेली आहे.
त्याचबरोबर जर आम्हाला रिटर्निंग ऑफिसरचे म्हणणे मान्य नसेल तर पुढील प्रक्रियेसाठी आम्हाला पुन्हा संधी उच्च न्यायालयाने दिलेली आहे, असे प्रा. रामदास झोळ यांनी सांगितले आहे.
