सुभाष शिंदे यांची धर्मवीर संभाजी अर्बन को-ऑप बँक लि. पुणे” च्या संचालक पदी , निवड झाल्याबद्दल मकाई परिवर्तन पॅनलच्या वतीने सत्कार
करमाळा प्रतिनिधी श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, श्री. सुभाष बापूराव शिंदे साहेब, यांची “धर्मवीर संभाजी अर्बन को-ऑप बँक लि. पुणे” च्या संचालक पदी 1570 मताधिक्याने चौथ्या क्रमांकाने, संचालक पदी निवड झाल्याबद्दल *मकाई परिवर्तन पॅनल* च्या वतीने आज सत्कार करण्यात आला. त्यावेळी मकाई परिवर्तन पॅनेलचे* प्रमुख प्रा. रामदास मधुकर झोळ सर यांच्यासह आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन वामन दादा बदे साहेब, तसेच सर्व मकाई परिवर्तन पॅनलचे पदाधिकारी यांनी सत्कार केला.
या कार्यक्रमास खालील मान्यवर आवर्जून उपस्थित होते. शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा. श्री रवींद्र गोडगे तसेच दीपक शिंदे, रामभाऊ शेळके, अमोल घुमरे, बापू फडतरे, नवनाथ नीळ, बाबाजान खान, अशोक लवंगारे, बापू वाडेकर, राजेंद्र शेळके, तुकाराम काळे इ. मान्यवर उपस्थित होते. तसेच पोत्रे येथील मा. प्रभाकर शिंदे, हरिभाऊ जिंजाडे, किसन शिंदे, संतोष वाळुंजकर, नामदेव शिंदे, हरिभाऊ शिंदे, अशोक शिंदे, हनुमंत शिंदे, योगेश ननवरे, भीमराव वाळुंजकर, आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच वाशिंबे गावातील माजी सरपंच माननीय श्री भगवान डोंबाळे उपस्थित होते.
