Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

शिवसेनेच्या प्रयत्नाने करमाळा तालुक्यातील धायखिंडीत एसटी बस सुरू विद्यार्थ्यांत आनंदोत्सव

 


करमाळा प्रतिनिधी

करंजे ते करमाळा या एसटी करंजे व बालेवाडी येथूनच पूर्णपणे विद्यार्थी भरून येत असल्यामुळे दाईखिंडी येथील विद्यार्थ्यांना चालतच शाळेसाठी करमाळ्याला यावे लागत होत.गाडी सातत्याने फुल असल्यामुळे डायव्हर कंडक्टर व इतरांनाही काही करता येत नव्हतेयावेळी करंजे ते करमाळा या रस्त्यावर सकाळी सात वाजताच्या दरम्यान दोन बसेस सोडाव्यात अशी मागणी शिवसेना शाखाप्रमुख बाबासाहेब तोरणे यांनी केली. करमाळा एसटी डेपो मॅनेजर होनराव साहेब यांना हा प्रकार सांगितला .दररोज 40 ते 50 मुला मुलींना चालत करमाळ्याला येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तात्काळ कर्तव्यदक्ष एसटी डेपो मॅनेजर होनराव यांनी अजून एक स्वतंत्र् एसटी बस सेवा सुरू करण्याचे आदेश दिलेकरंजे बाळेवाडी दाहिखिडी या तीन गावातून सुमारे दोनशे विद्यार्थी रोज सकाळी सात वाजता शहरात शिकण्यासाठी येतात याशिवाय बाजाराला व मजुरीसाठी करमाळ्यात येणारे दवाखान्यासाठी येणारी नागरिक यामुळे एक एसटी पूर्णपणे गच्च भरली जात असे आज आलेल्या या एसटीचे ग्रामस्थांच्यावतीने मोठ्या उत्साहात स्वागत करून एसटीचे ड्रायव्हर कंडक्टर यांचा नारळ घेऊन सत्कार करण्यात आला.यवेळी ग्रामपंचायत सरपंच बाळासाहेब मोटे,ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब वायकुळे,तात्यासाहेब माने आत्माराम वायकुळे दादा देवकते आबासाहेब खामगढ ,सोनू खामगळ अशोक मोटे हनुमंत वाडेकर सोमनाथ पांडुरंग मोटे बाबीर सरगरआदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group