गजानन स्पोर्ट्स ॲड सोशल क्लबचे सदस्य सेवानिवृत्त मेजर अमोल कांबळे यांचा सत्कार
करमाळा प्रतिनिधी गजानन स्पोर्ट्स ॲड सोशल क्लबचे सदस्य करमाळा शहरातील सुमंतनगर येथील अमोल कांबळे यांचा देशसेवेतून सेवानिवृत्त झाल्यामुळे सत्कार करण्यात आला आहे. गजानन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने हा सत्कार करण्यात आला आहे. सेवानिवृत्त अमोल कांबळे हे बालपणापासून गजानन स्पोर्ट्स क्लबचे सदस्य आहेत.
देशसेवा बजावत असतानाही करमाळ्यात आल्यानंतर ते गजानन स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्यात पुढाकार घेत होते. मेजर अमोल कांबळे हे सेवानिवृत्त झाले असून त्यांचे वडील देखील मेजर होते. यांचा करमाळा येथे गजानन स्पोर्ट्स ॲड सोशल क्लबच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. करमाळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे शिक्षण समितीचे माजी सभापती प्रकाश बलदोटा यांच्या हस्ते हा सत्कार झाला.या सत्कार समारंभास गजानन स्पोर्ट्स ॲड सोशल क्लब चे सदस्य समीर बागवान, चेतन ढाळे, दिगंबर ठोंबरे, चिन्मय मोरे, राहुल किरवे, शरीफ दारूवाले आदी उपस्थित होते.
: