श्री कमलादेवी मंदीर जतन व संवर्धन कामास धायखिंडीच्या भक्तांकडून १ लाख रूपये ची देणगी
करमाळा प्रतिनिधी- श्री जगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्ट च्या संयोजनाने श्री कमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या दोन महिन्यांपासून कामास सुरुवात करण्यात आली. असून ट्रस्ट चे अध्यक्ष सोमनाथ चिवटे यांना मदतीचे आवाहन भक्तांकडे केले असता.आज श्री.कमलेश मोहन माने. रा.धायखिंडी यांनी रोख रूपये १ लाख तर श्री अनिल उपळाईकर राहणार पुणे यांनी देखील १ लाख रूपयांची रोख
स्वरूपात दिली तर श्री प्रसाद परब रा. मुंबई यांच्याकडून
११०००/- व चि. ध्रुव रविराज पुराणिक यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रविराज सुधीर पुराणिक रा. श्रीदेवीचा माळ यांच्याकडून रुपये
११०००/- श्री कमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामास देणगी दिली. यानिमित्त त्यांचा सत्कार मंदिर समितीच्या वतीने करण्यात आला .मंदिर समितीचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील, विश्वस्त डॉक्टर प्रदीपकुमार जाधव पाटील, विश्वस्त डॉक्टर महेंद्र नगरे, विश्वस्त सुशील राठोड विश्वस्त राजेंद्र वाशिंबेकर ,विश्वस्त ॲड. शिरीषकुमार लोणकर ,मंदिर पुजारी,रोहित पुजारी, सचिन सोरटे, धनंजय सोरटे उपस्थित होते. प्रशासन अधिकारी महादेव भोसले व्यवस्थापक अशोक गाठे. उपस्थित होते. या निमित्ताने श्रीकमलाभवानी मंदीर जिणीध्दाराच्या कामासाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन देखील ट्रस्ट च्या माध्यमातून करण्यात आले.
