पांडुरंगाच्या प्रती असलेला दृढ भाव जीवनाचे सार्थक सांगणारी वारी मानवी जीवनासाठी प्रेरणादायी-दिग्विजय बागल
करमाळा प्रतिनिधी पंढरीच्या पांडुरंगाप्रती श्रध्दा ठेवुन आयुष्यापासून काही दिवस दूर होऊन पायी दिंडीतून मिळणारे अध्यात्मिक समाधान यातून जीवनाचे सार्थक सांगणारी वारी ही संकल्पना मानवी जीवाच्या उद्धारासाठी प्रेरणादायी आहे असे मत मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी व्यक्त केले.
श्री संत स्वामी रघुराज महाराज माघवारी पायी दिंडी सोहळा वाटचालीमध्ये सांगवी फाटा येथे उपस्थित राहून श्री मकाई सहकारी साखर कारखाना चेअरमन युवा नेते श्री दिग्विजय भैय्या बागल यांनी शुभेच्छा देऊन सांगवी ते कंदर दिंडीत सहभाग घेतला. पृथ्वीवरील असंख्य भाविक मोठ्या संखेने एकत्र येऊन मानवी जीवाच्या कल्याणासाठी, आत्मिक उद्धारासाठी, समतेसाठी परमेश्वरप्राप्तीसाठी वारीतून विठ्ठलाकडे साकडे घालणारी वारकरी परंपरा असून पंढरीची ही वारी म्हणजे पृथ्वीवरील एक अभूतपूर्व सोहळाच म्हणावा लागेल.
श्री संत स्वामी रघुराज महाराज माघवारी पायी दिंडी सोहळा वाटचालीमध्ये सांगवी फटा उपस्थित राहून श्री मकाई सहकारी साखर कारखाना चेअरमन युवा नेते श्री दिग्विजय भैय्या बागल यांनी शुभेच्छा देऊन सांगवी ते कंदर दिंडीत सहभाग घेतला यावेळी दिंडी चालक ह भ प रामभाऊ महाराज निंबाळकर तसेच ह.भ.प.अनिरुद्ध महाराज निंबाळकर मार्केट कमिटी संचालक रंगनाथ शिंदे,मकाई संचालक बापूमामा कदम,मा. संचालक सरपंच अँड दत्तात्रय सोनवणे वकील साहेब, सचिन बापु पिसाळ, सरडे सर, धर्मादादा लोकरे, भागवतदादा पाटील, सुभाष पवार, बाळासाहेब पराडे, सागर शिंदे,विवेक भोसले, संतोष माने तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.कोणतेही निमंत्रण नसताना लाखोंच्या संखेने एकत्र येऊन दैदिप्यमान सोहळ्यातील सात्विकता, त्याग, भक्ती, निस्पृहता यामुळे वारी हा एक सत्वगुणाचा सोहळा आहे.
