एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी शिक्षण महत्वाचे : पोलिस निरीक्षक विनोद घुगे
करमाळा प्रतिनिधी- विकासाच्या प्रवाहापासून दूर असलेल्या घटकांनी शिक्षणाचे महत्व समजून घेतले पाहिजे. शिक्षणाशिवाय प्रगती होवू शकत नाही. विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे. असे प्रतिपादन करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले आहे.
येथील एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पो. नि. घुगे हे बोलत होते. याप्रसंगी आश्रमशाळेचे संस्थापक-अध्यक्ष रामकृष्ण माने हे अध्यक्षस्थानी होते. तर यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे – पाटील, ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले, आशपाक सय्यद, स.पो.नि. बिभिषण जाधव, स्नेहालय इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष जयंत दळवी, दिनेश मडके, मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप, देवळालीच्या सरपंच अश्विनी शिंदे, अनिता राऊत, माधुरी परदेशी, धनंजय शिंदे, युवा एकलव्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष ॲड. संग्राम माने, उद्योजक संतोष कुलकर्णी, सोपान माने, बळीराम माने आदिंची प्रमुख उपस्थिती होती.सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आश्रमशाळेच्या वाटचालीविषयी स्वातीताई माने यांनी माहिती दिली. याप्रसंगी माने यांनी, तळागाळातील घटकातील मुलांना गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरु असताना समाजातील विविध शिक्षणप्रेमींनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. तर प्रा. करे – पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले. तसेच, समाजातील वंचित, उपेक्षित घटकातील मुलांना शिक्षण देण्यासाठी आश्रमशाळेच्या माध्यमातून रामकृष्ण माने यांनी उभारलेले शैक्षणिक कार्य उल्लेखनीय आहे. असे स्पष्ट केले.
दरम्यान आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर सादर केलेली नृत्ये, नकला, विनोदी नाटीका आदिंना उपस्थितांची मोठी दाद मिळाली. यावेळी यशकल्याणी संस्थेच्या वतीने आश्रमशाळेस स्मार्ट टी. व्ही. संच भेट देण्यात आला. या कार्यक्रमास युवा एकलव्य प्रतिष्ठाणचे सदस्य श्रेयश खडके, कृष्णा भागवत, सुयश खडके, शिक्षक नेते विक्रम राऊत, पत्रकार सिद्धार्थ वाघमारे, नागेश चेंडगे, विशाल परदेशी, सतीश कांबळे, उमाकांत जाधव, नितिन काळे, राजेंद्र सुर्यवंशी, आकाश वाघमारे आदिंसह आश्रमशाळेचे आजी-माजी विद्यार्थी, विद्यार्थीनी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वातीताई माने यांनी तर सुत्रसंचलन शिक्षक किशोरकुमार शिंदे यांनी केले. आभार विठ्ठल जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अशोककुमार सांगळे, अधीक्षक बाळासाहेब शिंदे, कविराज माने यांच्यासह आश्रमशाळेतील शिक्षक भास्कर वाळुंजकर, विलास कलाल, शिक्षिका विद्या पाटील, कुमार पाटील, प्रल्हाद राऊत, उमेश गायकवाड, सैदास काळे, वंदना भालशंकर, दिपाली माने तसेच युवा एकलव्य प्रतिष्ठाणचे सदस्य आदिंनी परिश्रम घेतले.
—
