भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा करमाळा तालुका अध्यक्षपदी अमोल पवार यांची निवड
करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा करमाळा तालुका अध्यक्षपदी वाशिंबे गावचे माजी उपसरपंच अमोल पवार यांची निवड करण्यात आली आहे.
त्यांची निवड देवळाली ता. करमाळा येथील भाजप कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यामध्ये माजी सहकार राज्यमंत्री आमदार सुभाष बापू देशमुख भारतीय जनता पार्टी जिल्हाअध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या हस्ते पत्र देऊन शाल श्रीफळ मानाचा फेटा बांधून सत्कार करून करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड करण्यात आली आहे . जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे यांच्या सहकाऱ्यांने युवकाचे संघटन करून करमाळा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे काम वाढवणार असल्याचे अमोल पवार यांनी सांगितले. अमोल पवार हे वाशिंबे गावचे माजी उपसरपंच असून मकाई सहकारी साखर कारखान्याची संचालक म्हणूनही त्यांनी यशस्वीपणे काम केले आहे. पश्चिम भागामध्ये भारतीय जनता पार्टी भक्कम करण्यासाठी अमोल पवार यांनी चांगले काम केल्यामुळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीचे स्वागत करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले असून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
