माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते मुख्यमंत्री वैद्यकिय सहायता मदत कक्षाचे कक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांचा सत्कार
करमाळा प्रतिनिधी मुख्यमंत्री वैद्यकिय सहायता मदत कक्षाचे कक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (OSD )श्री मंगेश चिवटे यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेत शुभाशिर्वाद घेतले . यावेळी माजी आमदार जगताप यांनी चिवटे यांचा यथोचित सन्मान व सत्कार करून त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्यास शुभेच्छा दिल्या . यावेळी जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे,माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे , जिल्हा मध्य बँकेचे सिनियर बँक इन्सपेक्टर आण्णासाहेब आवटे, बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर, गटसचिव संघटनेचे बबनराव मेहेर, वीरशैव लिंगायत समाज युवा आघाडीचे अध्यक्ष उत्कर्ष शेटे (अकलूज),केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दिपक पाटणे, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य पी . ए .कापले,जे .जे . मित्रमंडळाचे अध्यक्ष रमेश वीर, माँसाहेब पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र चिवटे , माजी नगरसेवक दिगंबर रासकर आदी उपस्थित होते .
