दत्तकला शिक्षण संस्थेत भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
करमाळा प्रतिनिधी दत्तकला शिक्षण संस्थेत भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला. याप्रसंगी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री रामदास झोळ सर ,संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय श्री राणा दादा सूर्यवंशी साहेब ,सचिव सौ. माया झोळ मॅडम , आदरणीय श्री. मधुकरकाका झोळ ,संस्थेचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी प्रा.डॉ.बाबर सर, सर्व विभागांचे प्राचार्य,सर्व विभाग प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते..
आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी आपणा सर्वांचे पितृतुल्य व्यक्तिमत्व आदरणीय मधुकरकाका झोळ याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला…स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्याद्वारे विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले. तसेच विद्यार्थ्यांनी आपली मनोगते या प्रसंगी व्यक्त केली. या प्रसंगी बोलतांना संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री रामदास झोळ सर यांनी आपल्या भाषणात , भारताच्या आर्थिक परिस्थितीचा तसेच विविध क्षेत्रातील प्रगतीचा थोडक्यात आढावा घेतला . तसेच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या आपल्या देशापुढे असणाऱ्या आव्हानांवर भाष्य केले.याच सोबत नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणाऐवजी व्यावसायिक शिक्षण घ्यावे, ही काळाची गरज आहे असा संदेश दिला.अशाप्रकारे मान्यवरांच्या उस्थितीत आजचा कार्यक्रम उत्साहात आणि आनंदात पर पडला.
