दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी राज धायगुडे व संचित होले यांची तालुकास्तरीय योगा स्पर्धेत प्रथम क्रमांक व जिल्हास्तरी योगा स्पर्धेत निवड.*
करमाळा प्रतिनिधी दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी राज धायगुडे व संचित होले यांची तालुकास्तरीय योगा स्पर्धेत प्रथम क्रमांक व जिल्हास्तरी योगा स्पर्धेत निवड.झाली आहे.
दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी गणेश हॉल, ज्युनियर लायब्ररी, क्रांती मैदान, दौंड या ठिकाणी *क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे तालुकास्तरीय शालेय योगा स्पर्धा* आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत *इयत्ता बारावी कॉमर्स चा विद्यार्थी संचित धर्मराज होले 17 वर्षाखालील रिद्धीमिक योगा या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक* तसेच, *इयत्ता अकरावी सायन्स चा विद्यार्थी राज विशाल धायगुडे 19 वर्षाखालील योगा प्रकारामध्ये प्रथम क्रमांक* या दोन्ही विद्यार्थ्यांची निवड *दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी जुन्नर या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेत निवड.झाली आहे.
या विजेते विद्यार्थ्यांना *मार्गदर्शन दत्तकला शिक्षण संस्थेचे क्रीडा शिक्षक प्रदीप सुनिल शिवपुजे सर* यांनी केले.
तसेच विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन *दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय रामदास झोळ सर, उपाध्यक्ष माननीय राणादादा सूर्यवंशी साहेब, सचिवा सौ.माया झोळ मॅडम, प्रशासकीय अधिकारी डॉक्टर विशाल बाबर सर, (स्कूल ऑफ डायरेक्टर) प्राचार्य सौ. नंदा ताटे मॅडम, (एस.एस.सी.) व ज्युनिअर कॉलेज प्राचार्य सौ. सिंधू यादव मॅडम, विभाग प्रमुख प्रा. खाडे मॅडम, प्रा. धर्मेंद्र धेंडे सर* व सर्व शिक्षक वृंदावन यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.
