आषाढी वारीच्या पाश्र्वभूमीवर करमाळा टेंभुर्णी रोडवरील खड्डे त्वरित बुजवुन झाडे झुडपे काढण्याची देवळालीचे सरपंच आशिष गायकवाड यांची मागणी
करमाळा प्रतिनिधी
आषाढी वारीच्या पाश्र्वभूमीवर करमाळा टेंभुर्णी रोडवरील खड्डे त्वरित बुजवुन झाडे झुडपे काढण्यात यावे अशी मागणी उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे देवळालीचे सरपंच आशिष गायकवाड यांनी केली आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की करमाळा टेंभुर्णी रोड वर पडलेले खड्डे व रस्त्याच्या कडेला आलेली झाडे झुडपे यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत तसेच देवळाली गावापासून 200 मीटर अंतरावर करमाळा कडे जाणाऱ्या दोन्ही बाजूंला काटेरी झुडपे रोडवर आलेले आहेत तरी काटेरी झुडपे काढावीत व देवळालीमध्ये हायवेवर असलेले गतिरोधक वर पांढरी पट्टे देण्यात यावे जेणेकरून रोडवर होणारे अपघात टळतील सध्या रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत तसेच काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आषाढी वारी मुळे लोकांची गर्दी वाढणार आहे त्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत व रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी काटेरी झाडे झुडपे काढण्यात यावे सदर बाबींची कारवाई योग्य वेळेत न झाल्यास होणाऱ्या दुर्दवी घटनेस प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असे सरपंच आशिष गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
