नेरले येथील मुक्कामी एस. टी. बस चालू करण्याची मागणी
करमाळा प्रतिनिधी :-कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षा पासून शाळा, कॉलेज आणि काही दिवसापूर्वी एस. टी .कर्मचाऱ्याच्या आंदोलना मुळे एस. टी. बंद होती. त्या काळात भरपूर विद्याथ्याचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोना महामारीतुन दिलासा मिळाला असुन
सध्या काही दिवसा पासून विद्यार्थ्याची सुरळीत शाळा, कॉलेज सुरू झाले आहे. दररोज लोकांचे येणे, जाणे सुरु झाले आहे तरी विद्यार्थ्याची शिक्षणाची गैरसोय दुर करण्यासाठी नागरिकांना प्रवास करण्यासाठी नेरले येथील मुक्कामी बस चालू करावी अशी मागणी निवेदनद्वारे राष्ट्वादी युवक तालुका उपाध्यक्ष सागर काळे यांनी केली आहे.
