राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या तालुका उपाध्यक्षपदी हनुमंत रगडे यांची निवड.

करमाळा प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या करमाळा तालुका उपाध्यक्षपदी मोरवड येथील हनुमंत रगडे यांची निवड आज करण्यात आली.निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय अडसूळ यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड.आजिनाथ शिंदे,पदवीधर सेलचे प्रदेश सदस्य नितीन झिंजाडे, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष महेश काळे पाटील,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव आदी उपस्थित होते.
