गजानन सोशल ॲन्ड स्पोर्ट्स क्लब गणेश जयंती यंदाच्या वर्षी मोठया उत्साहात साजरी करणार -प्रशांत ढाळे
करमाळा प्रतिनिधी गजानन सोशल स्पोर्ट्स क्लब यंदाच्या वर्षी गणेश जयंती मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी मोठया उत्साहात आनंदात साजरी करण्यात येणार आहे अशी माहिती गजानन सोशल ॲन्ड स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी दिली आहे. यावर्षी होम हवन सहस्त्र आवर्तन गणेश याग करून सायंकाळी ६ते १० या वेळेत महाप्रसाद देऊन गणेश जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे करमाळा शहरातील भाविक भक्तांनी याची नोंद घेऊन लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. गजानन सोशल ॲन्ड स्पोर्ट्स क्लब दरवर्षीप्रमाणे गणेश जयंती उत्सव शहरातील वेताळपेठ येथे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येऊन संपूर्ण करमाळा शहरातील नागरिकांना महाप्रसाद दिला जाणार आहे. गजानन स्पोर्टर्स ॲण्ड सोशल क्लबच्यावतीने आयोजित गणेश जयंती उत्सवात सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेऊन गुण्यागोविंदाने या उत्सवात सहभागी होतात. यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट दुर झाल्यामुळे गणेश जयंती उत्सव मोठया साजरा होणार असल्याचे अध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी सांगितले आहे.
