करमाळा

प्रा. डॉ.इंद्रजीत वीर यांच्या कादंबरीतील नवता या समीक्षा ग्रंथाचे प्रकाशन

करमाळा प्रतिनिधी
शेलगाव क ,ता. करमाळा येथील रहिवासी असलेले व सध्या आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा खटकाळे ता. जुन्नर येथे कार्यरत असलेले प्रा. डॉ. इंद्रजीत वीर यांच्या कादंबरीतील नवता या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक 18 जून 2023 रोजी टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयात आयोजित केलेल्या प्रगतिशील लेखक संघाच्या पाचव्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये सुप्रसिद्ध कवी प्रा. डॉ. राजेंद्र दास ,प्राचार्य डॉ. महेंद्र कदम , कवयित्री माधुरी मरकड, वीरा राठोड ,अविनाश उषा वसंत या अभ्यासकांच्या हस्ते करण्यात आले.
प्रा. डॉ. इंद्रजीत वीर यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे प्रा.डॉ.विश्वनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली “मराठी आणि हिंदी कादंबरी मधील नवतेचा तौलनिक अभ्यास अभ्यास” ( इ.स सन 1960 ते 1985 मधील निवडक कादंबरीच्या संदर्भात ) या विषयावर पीएच.डी प्रबंध सादर केलेला होता .सदर प्रबंध पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याचे काम शब्दालय प्रकाशन श्रीरामपूर यांनी केले असून सदर ग्रंथ कादंबरी या साहित्य प्रकाराच्या अभ्यासकांसाठी मौलिक मार्गदर्शन करणारा आहे.
या ग्रंथासंदर्भात प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे म्हणतात की, कादंबरीतील नवता या ग्रंथांमध्ये 1960 नंतरच्या मराठी व हिंदी कादंबरी मधील नवतेचा तौलनिक शोध घेतला आहे . तौलनिक साहित्य अभ्यासाचे स्वरूप अभ्यासून नवतेचा तात्विक अंगाने अर्थनिर्णय करत वाङ्मयात नवता प्रकटीकरणास बदलत्या सामाजिक, सांस्कृतिक विश्वातील घडामोडी कशा कारणीभूत ठरल्या आहेत यासंबंधीची कारणमीमांसा या ग्रंथात केली आहे.
सदर ग्रंथ प्रकाशन सोहळा प्रसंगी शेलगाव क गावचे माजी उपसरपंच सचिन पाटील, मिरजगाव येथील महात्मा फुले नूतन महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आप्पा माने, डॉ.विकास वीर ,प्रकाश ढावरे सर, सौ.वर्षा वीर आदी उपस्थित होते. सदर पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल करमाळा तालुक्याचे आ. संजयमामा शिंदे शेलगाव क चे सरपंच अशोक काटुळे ,उपसरपंच प्रतिनिधी सचिन वीर यांनी अभिनंदन केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group