भारतीय जनता पार्टी करमाळा तालुका पंतजली समितीच्यावतीने 21जुन रोजी आंतरराष्ट्रीय योग शिबीराचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टी करमाळा तालुका व पतंजली योग समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग शिबिराचे औचित्य साधून बुधवार दि. 21 जून रोजी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, योगामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक बदल घडतात, शारीरिकदृष्ट्या नागरिकांनी दररोज योग करून आपले शरीर जपावे, या शिबिरात पतंजली योग शिबिराचे शिक्षक म्हणून हनुमानसिंग परदेशी, रामचंद्र कदम सर,आरकिले सर , प्रवीण शहाणे सर आपणास योग शिबिराचे प्रशिक्षण देणार आहेत,हे शिबिर कन्या प्रशाला श्री देवीचा रोड करमाळा येथे बुधवार दिनांक 21 जुन रोजी सकाळी सात वाजता होणार आहे, तरी या शिबिराला करमाळा तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आव्हान भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे व पतंजली योग समिती तर्फे करण्यात आले आहे .
