सोलापूर जिल्हा निरीक्षक संग्रामसिंह पाटील यांच्या उपस्थितीत करमाळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक संपन्न
करमाळा प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष राकेश कामठे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता आढावा बैठक करमाळा तालूक्यातील केडगाव येथे उत्साहात पार पडली. पदाधिकाऱ्यांनी करमाळा तालुक्यात सामाजिक कार्यातून युवकांचे संघटन अजून मजबूत करावं तसेच युवकांनी तळागाळात जाऊन राष्ट्रवादी पक्ष कसा वाढेल यासाठी प्रयत्न करावेत असे निरीक्षक संग्रामसिंह पाटील यांनी सांगितले. करमाळा तालुक्यातील प्रत्येक जिल्हापरिषद गटामध्ये जिल्हा परिषद गट प्रमुख , तसेच त्या जिल्हापारिषद गटामधील 2 पंचायत समिती गणामध्ये 2 उपाध्यक्ष, सरचिटणीस, सह सरचिटणीस, सचिव, कार्यकारणी सदस्य या प्रमाणे संपूर्ण कार्यकारणी तयार करावी. तसेच 1 बूथ 10 यूथ अशी बूथबांधणी करावी तसेच करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावागावात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नव्याने शाखा सुरू करण्यासाठी निरीक्षक पाटील यांनी सूचना केल्या, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी सर्व युवा कार्यकर्त्यांनी जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावावे तसेच निराधारांना आधार देण्याचे प्रामाणिक कार्य करू असा ऊपस्थित सर्व युवक कार्यकर्त्यांनी निश्चय केला. आमदार संजय मामा शिंदे यांनी करमाळा तालुक्यासाठी आजपर्यंत कोणत्याही नेत्यांनी आणला नाही एवढा भरगच्च निधी वेगवेगळ्या माध्यमातून तालुक्यामधे आणला असून सर्वसामान्य जनतेची काम करण्यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांच्यामार्फत आपली सगळी काम केली जातील असा विश्वास युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी उपस्थित युवक कार्यकर्त्यांना दिला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक संग्रामसिंह पाटील, युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक अव्हाड, कार्याध्यक्ष अक्षय भांड, बार्शीचे निरीक्षक अशपाक जमादार, जिल्हा उपाध्यक्ष महेश बोराडे, जिल्हा उपाध्यक्ष उदयसिंह साखरे, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पोळ, जिल्हा खजिनदार राजेंद्र सूर्यवंशी, करमाळा तालुकाध्यक्ष किरण फुंदे, तालुका कार्याध्यक्ष अक्षय गायकवाड, शहराध्यक्ष सोहेल पठाण, तालुका उपाध्यक्ष स्वप्नील पाडुळे, तालुका उपाध्यक्ष शिवम बोराडे, विशाल बोराडे, गणेश कानगुडे, दत्तात्रय बोराडे, कैलास कानगुडे, ज्ञानेश्वर माळी, अक्षय गव्हाणे, विवेक बोराडे, आयुब शेख, नागेश दुधात, सौरभ कोळेकर यांच्यासह करमाळा तालुका व शहरातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
