भाजपच्या प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची करमाळा काॅग्रेंस आयची मागणी
करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी नुकतेच Timeshow टिव्ही चॕनेलवर मुलाखत देत असताना नुपुर शर्मा यांनी इस्लाम धर्मा विषयी कोणताही गाढा अभ्यास नसाताना किंबहुना सखोल माहीतीही नसताना मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी गरळ ओकुन फक्त देशातीलच नव्हे तर संपुर्ण जगभरातील २५० कोटीपेक्षाही ज्यास्त अनुयायी असणाऱ्या मुस्लिम धर्माच्या भावना भडकवण्याचे केलेले कृत्य हे अत्यंत निंदणीय असल्याचे मत अखिल भारतीय काँग्रेस आय पक्षाचे करमाळा तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी व्यक्त केले.ते नुपुर शर्मा यांनी व्यक्त केलेल्या वक्तव्याच्या निषेध बैठकीमध्ये ते बोलत होते.अधिक बोलताना श्री जगताप पुढे म्हणाले कि नुपुर शर्मा यांनी केलेले वक्तव्य हे देशाला संपुर्ण जगासमोर मान खाली घालायला लावणारे आहे.त्यांचे वक्तव्य इस्लाम प्रेषितांचा अपमान करताना दिसत आहे.आणि तिच्या अश्या टिप्पण्यामुळे देशात जातीय तणाव निर्माण होऊ शकतो.त्यामुळे भारतीय दंड संहीतेच्या कलमा नुसार नुपुर शर्मावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आम्ही मा.तहसीलदारसाहेब करमाळा व मा.पोलिस निरिक्षक करमाळा यांना लेखी निवेदन दिले आहे.हे निवेदन अखिल भारतीय काँग्रेस आय करमाळ्याचे अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष दस्तगीर रहीम पठाण , ओ.बी.सी.सेल चे तालुकाध्यक्ष गफुरभाई यासीन शेख ,अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष साहील फारुक सय्यद,उत्तरेश्वर सावंत,सुजय जगताप,योगेश राखुंडे,नितीन चोपडे,अजहर पठाण,मुस्तकिम पठाण,अमीर शेख,आदी उपस्थित होते.
