Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळासामाजिक

मराठाद्वेषी पोलीस निरीक्षक गुन्हा दाखल करून शासकीय सेवेतून बडतर्फ करा नितिन खटके पुणे विभागीय कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांची मागणी

 

करमाळा प्रतिनिधी मराठा समाजाबद्दल गरळ ओकणाऱ्या पोलीस निरीक्षक किरण बकाले यास सरकारी सेवेतून बडतर्फ करा आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेल द्वारे केली आहे.
जोपर्यंत बकालेवर ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत संभाजी ब्रिगेड स्वास्थ्य बसणार नाही असा इशाराही संभाजी ब्रिगेड च्या वतीने देण्यात आला आहे.
जळगाव एलसीबीचा पीआय किरण बकालेने मराठा समाज बद्दल अतिशय घाणेरडे, अश्लील, भावना दुखावणारे व जाती-जातीत तेढ निर्माण करणारे भाष्य केले आहे, ते आम्हाला प्रसार मध्यम व विविध सोशल मीडिया द्वारे माहीत झाले आहे. आम्ही मराठा समाजातील तील असून आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, तसेच त्याच्या वक्तव्यामुळे सर्व मराठा समाज चा अपमान झाला आहे.
सदर व्यक्ती किरण बकाले हा पोलीस सेवेत असून त्याने हे व्यक्ताव जाणून बुजून व मराठा समाजाच्या भावना दुखावन्याचा उद्देशाने करून जाती जातीत तेढ निर्माण केली आहे.म्हणून त्याच्यावर तात्काळ भादंवि कलम ,153अ 500, 503, 504, 505 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करून शासकीय सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group