नवयुग कला क्रिडा सांस्कृतिक मंडळाकडून अमित निमकर यांचा सत्कार.
वाशिंबे प्रतिनिधी
वाशिंबे ता. करमाळा येथील ऊपकार्यकारी अभियंता अमित निमकर यांना अभियंता दिना निमित्त महाराष्ट्र शासनाचा ऊत्कृष्ट अभियंता पुरस्कार मिळाल्या बद्दल नवयुग कला क्रिडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने निमकर यांचा सत्कार करण्यात आला.करमाळा तालुक्यातील कोर्टी ते टाकळी व कुंभेज फाटा ते करपडी फाटा रस्त्यासाठी निमकर यांच्या कार्यकाळात २००कोटी रुपयाचा निधी तसेच करमाळा तालुक्यातील ईतर रस्त्यासाठी निधी मिळवण्यात अमित निमकर यांचा सिंहाचा वाटा आहे.याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार मिळाळा याबद्दल नवयुग कला क्रिडा सांस्कृतिक मंडळातर्फे निमकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मनोहर झोळ, प्रा.जाकीर शेख,गणेश झोळ,रणजीत शिंदे,सतिष झोळ,सुयोग झोळ,भागवत राऊत, अमोल साळुंके,हनुमंत झोळ,शुभम झोळ,जयदीप झोळ,नाना खानवरे,संतोष झोळ उपस्थित होते.
