Wednesday, April 16, 2025
Latest:
करमाळा

विद्यार्थ्यांनी वेळेत जात पडताळणी करून घ्यावी-सचिन कवले

करमाळा प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीचे मुख्य माननीय सचिन कवले साहेब यांनी महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेजचे अकरावी आणि बारावी शास्त्राच्या विद्यार्थ्यांना वेळेत जात पडताळणी करून घ्या असा सल्ला दिला.
सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीचे मुख्य अधिकारी श्री सचिन कवले साहेब यांनी विद्यार्थ्यांशी बुधवार दिनांक 13/07/2022 रोजी संवाद साधला एन परीक्षेच्या वेळी जात पडताळणीसाठी हेलपाटे न घालता आत्ताच जात पडताळणी ला ऑनलाईन एप्लीकेशन करून लवकरात लवकर जात पडताळणी करून घ्यावी आणि पुढील प्रवेशासाठी त्याचा निश्चित उपयोग होईल असे त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये सांगितले यापूर्वी जात पडताळणीसाठी प्रकरण दाखल केलेली पावती बारावीनंतर चालत होती परंतु आता नियम बदलला असून इयत्ता बारावी मध्येच सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आपापली जात पडताळणी करून पुढील व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेशासाठी जात पडताळणी करणे अनिवार्य आहे असे श्री कवले साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये सांगितले त्याचप्रमाणे जात पडताळणीसाठी काय काय करावे लागते कोण कोणती कागदपत्रे लागतात त्याची प्रक्रिया कशी असते याची सर्व माहिती विद्यार्थ्यांना श्रीकवले साहेबांनी सांगून विद्यार्थ्यांच्या संख्येचे निरसन केले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जात पडताळणी विषयक जी भीती निर्माण झाली होती ती नष्ट झाली. त्यामुळे श्री कवले साहेबांनी कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना जात पडताळणी करून घेण्यासाठी जे प्रोत्साहन देतात त्यांचे जिल्ह्यामध्ये सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे. या कार्यक्रमाला महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेजची प्राचार्य श्री कापले सर यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात पडताळणी किती आवश्यक आहे त्याचे फायदे काय आहेत याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. कवले साहेबांबरोबर त्यांच्या टीम मधल्या इतरही कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केले .प्रास्ताविक आणि प्रास्ताविक विज्ञान विभाग प्रमुख श्री .विजय पवार सर यांनी केले. तर महात्मा गांधी विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री वीर सर यांनी उपस्थित सर्व अधिकारी वर्गाचे आभार मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group