विद्यार्थ्यांचा शिक्षणातून उत्कर्ष होतो – सचिन कौले
करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांच्या जात पडताळणी संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी संशोधन अधिकारी , जात पडताळणी समिती , सोलापूरचे सचिन कौले साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणातून विद्यार्थ्यांचा उत्कर्ष होतो असे गौरवोद्गार काढले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून अभ्यास केल्यास यश हमखास मिळते. तसेच यावेळी त्यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणीसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. एकही विद्यार्थी जात पडताळणीपासून वंचित राहू नये असे आवाहन केले.
तसेच या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल. बी. पाटील , उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक , जात पडताळणी कार्यालयाचे खटकेसाहेब , अलिम शेख उपस्थित होते .
या कार्यक्रमासाठी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख यांनी केले तर आभार प्रा. सौ. सुवर्णा कसबे यांनी मानले.
