करमाळा तालुक्यात 22 जुलै रोजी 14 पाॅझिटीव्ह एकुण कोरोना रुग्णांची संख्या 64

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहर व ग्रामीण भागातील 22 जुलै रोजी एकूण 66 antigen टेस्ट घेण्यात आल्या असून त्यामध्ये एकूण 14 पाॅझिटीव्ह व 52 निगेटिव्ह आले आहेत.14 पैकी करमाळा शहरातील 1 पुरुष वेताळपेठ येथील रहिवासी आहे.
तर ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव चांगला. वाढत असून यामध्ये वरकुटे 5 ( 4 पुरुष +1स्त्री). सालसे-4 (2 पुरुष +2 स्त्री ) आळसुंदे 04 येथील. (2 पुरुष +2स्त्री) असे ग्रामीण भागातील 13 पाॅझिटीव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत करमाळा शहर व ग्रामीण भागातील एकुण कोरोना रुग्णांची संख्या 64 इतकी झाली आहे. अलिकडील काळात रूग्णांची संख्या वाढत असली तरी लोकांनी स्वंयशिस्त पाळावी. रॅपिड अँटिजेन test ची संख्या तालुक्यात वाढविण्यात येणार आहे.
प्रशासनाच्या सुचनांची अंमलबजावणी करावी.मास्क सॅनिटायझरचा वापर करा.आपले हात वारंवार स्वच्छ धुवा असे आवाहन करमाळा तहसीलदार समीर माने यांनी केले आहे .

