Uncategorized

समाज सुधारणा विकासासाठी अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची करमाळा तालूक्यातील पत्रकारांचा उत्तेरश्वर युवा परिवर्तन ग्रुप केमच्यावतीने सन्मान

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील पत्रकारिता सर्वसामान्य जनतेला न्याय देणारी असल्याने याचा आम्हास सार्थ अभिमान असून समाजकारण व राजकारणात विकाससाठी आम्हाला लेखणीच्या माध्यमातून आपण साथ दिली.या भावनेतुन आपण समाजाचे काही देणे लागतो अशीच साथ द्यावी कृतज्ञता म्हणुन करमाळा तालुक्यातील पत्रकार बांधवाचा सन्मान उत्तरेश्वर युवा परिवर्तन ग्रुप केमच्यावतीने करण्यात आला.
बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य यांच्यावतीने करमाळा तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा केम येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन अच्युत काका पाटील प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सागरराजे दौंड त्यांनी केले होते.अच्युत पाटील, संदीप तळेकर, महावीर तळेकर, सागर दोंड, परमेश्वर तळेकर, गणेश पवार, विष्णू पारखे, बाळासाहेब देवकर, आंनद शिंदे, महेश तळेकर, वर्षाताई चव्हाण, अनवर मुलाणी, सुभाष कळसाईत, बापू तळेकर, सतीश खानट, शिवाजी पाटील, संजय देवकर, दिलीप दोंड, महादेव पाटमास, धंनजय ताकमोगे, सचिन रणशृंगारे, विलास बिचितकर आदींनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. संभाजी ब्रिगेड प्रमुख नितीन खटके, राष्ट्रवादीचे दत्ता गवळी, विजयसिंह ओहोळ,अरुण लोंढे, दादासाहेब गोडसे, अजिनाथ लोकरे, गोरख जगदाळे, सागर कुर्डे, निखिल तळेकर, विष्णू अवघडे, दत्तात्रय बिचितकर, योगेश ओहळ, शिवाजी मोळीक, पांडुरंग तळेकर, रागू कोंडलकर, सुनील कोंडलकर, राहुल कोंडलकर, नामदेव पालवे, रमेश कोंडलकर, बबलू धोत्रे, बिनु कोंडलकर, बंडू कोंडलकर यांच्यासह करमाळा तालुक्यातील पत्रकार यावेळी उपस्थित होते.
विशाल घोलप, शंभू फरतडे,अशोक मुरूमकर, किशोर शिंदे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. पत्रकारांपुढील आव्हाने आणि सामाजिक दृष्टिकोन यावर मनोगत व्यक्त करतानाच केमसह तालुक्यामधील प्रश्न मांडण्यासाठी चळवळ उभी करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सकारात्मक दृष्टी ठेऊन समाजासाठी काम करण्याची आवश्यकता असल्याची भावना यावेळी मनोगतातून व्यक्त करण्यात आली.या कार्यक्रमांमध्ये पत्रकार आशपाक सय्यद, अलीम शेख ,दिनेश मडके,विशाल घोलप, बाळासाहेब सरडे,विजय निकत, सिध्दार्थ वाघमारे,सागर गायकवाड,सुयोग झोळ, किशोरकुमार शिंदे, शंभुराजे फरतडे,विशाल परदेशी ,गणेश जगताप,हर्षवर्धन गाडे, दिपक काकडे,राहुल रामदासी,संजय जाधव,धर्मराज दळवी,राहुल मखरे यांचा मानाचा फेटा गुलाब पुष्प ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.सामाजिक बांधिलकीचे भावनेतून समाज सुधारण्यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सदैव कार्यरत असणारी पत्रकार बांधवांचा सत्कार केम येथील उत्तरेश्वर वर्तन ग्रुपच्या वतीने करण्यात आल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या कार्यक्रमाचे प्रास्तविक युवा नेते सागरराजे दौंड,सूत्रसंचालन गणेश पवार आभार प्रहार संघटनेचे अध्यक्ष संदीप तळेकर यांनी केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!