मुस्लिम समाजाचे अध्यक्ष उस्मानशेठ तांबोळी यांना आमदार म्हणुन विधानपरिषदेवर घेण्याची मुस्लीम समाजाची मागणी
करमाळा प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्य मुस्लिम समाजाचे अध्यक्ष पुणे शहर काँग्रेस अल्पसंख्यांक अध्यक्ष उस्मानशेठ तांबोळी यांना विधान परिषदेवर घ्यावे अशी मागणी करमाळा तालुक्यामध्ये होत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये मुस्लिम समाजासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केला पुणे शहर काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र मध्ये काँग्रेस वाढवण्याचा प्रयत्न केला असून तळागाळापर्यंत काँग्रेस पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे करमाळा शहरांमध्ये व ग्रामीण भागामध्ये गोरगरिबांना मदतीचा हात त्यांनी दिलाआहे. उस्मान शेठ दानशूर व गोरगरिबांना मदत करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो म्हणून उस्मान शेठ तांबोळी यांना विधान परिषदेवर संधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी द्यावी करमाळा तालुक्यामधुन मागणी होत आहे.