दहीगाव उपसा सिंचन योजनेच्या पोटचाऱ्याचे काम पुर्ण करण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत आवताडे यांची गृह राज्यमंत्री मा. शंभुराजे देसाई यांच्याकडे मागणी

करमाळा प्रतिनिधी. दहीगाव उपसा सिंचन योजना शिवसेनेच्या काळात सुरू झाली आहे. करमाळा तालुक्यातील पुर्व भागातील शेतकरी वंचित असुन दहीगाव उपसा सिंचन योजनेतील सिंचन पोटचाऱ्या मंजूर झालेल्या पोटचाऱ्याचे काम पुर्ण होणे गरजेचे आहे तरी हे काम पूर्ण करण्याबाबतची मागणी महाराष्ट्र राज्याचे पणन व गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत आवताडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. दहीगाव उपसा सिंचन योजनेमुळे करमाळा तालुका सुजलाम सुफलाम झाला आहे.करमाळा तालुक्यातील येथील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. दहीगाव उपसा सिंचन योजनेतील पुर्व भागातील शेतकरी यापासून वंचित असुन येथील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी व त्यांचे जीवन सुखी समृद्ध संपन्न करण्यासाठी पांडे,फिसरे,हिसरे ,सालसे,शेलगाव व इतर गावांतील दहीगाव उपसा सिंचन योजनेतील पोटचाऱ्याचे काम पुर्ण होणे सध्या काळाची गरज आहे. तरी आपण हे काम करण्यासाठी आदेश देऊन काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत आवताडे, संदीप नेटके, सुनील नेटके, रामचंद्र पवार, औंदुबर रोकडे, घनश्याम पाटील, धनंजय नेटके, सुनिल काटे, हिरामण कदम,उमेश आवताडे, सोमनाथ पवळ, योगेश चाळक, शहाजी चाळक, धनंजय शिंदे, हनुमंत सरडे, भाऊसाहेब वीर, अशोक माने, महादेव चोपडे, अशोक माने, संतोष नेटके या पुर्व भागातील शेतकरी बांधवांच्या सह्या असुन दहीगाव उपसा सिंचन योजनेतील पुर्व भागातील पोट चाऱ्याची काम पुर्ण करण्याची मागणी केली आहे.
