Thursday, April 17, 2025
Latest:
कृषीजलविषयक

सोलापूरकरांच्या पाठीत खंजीर खुपसून लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेची ई-निविदा निघाली उजनी संघर्ष समितीची उद्या तातडीची बैठक- अतुल खुपसे

 

मोहोळ प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून पाणी पळवण्याचा बारामतीकरांचा अट्टाहास अजून संपलेला नसून इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी २१८७९.०३ लक्ष रुपयांची निविदा महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे १९ अंतर्गत कार्यकारी अभियंता, उजनी कालवा विभाग क्रमांक ८ सोलापूर यांनी काढली असून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केलेला अट्टाहास सध्याचे भाजप-शिवसेना सरकार पूर्ण करत असल्याचे दिसून येत असून याच अनुषंगाने इंदापूरला जाणारे उजनीचे पाणी वाचले पाहिजे यासाठी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीची उद्या दि.३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मोहोळ येथील शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित केली असल्याचे अध्यक्ष अतुल खूपसे-पाटील यांनी सांगितले.

यावेळी बोलताना सचिव माऊली हळद म्हणाली की, बारामतीकरांनी उजनीचे पाणी पळविण्याचा घाट बांधला असून तो आणि म्हणून पाडला आहे. तरीही तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सोलापूरकरांच्या पाठीत खंजीर खुपसून या संदर्भात प्रक्रिया सुरूच ठेवली. याला भाजप शिवसेना सरकारने खतपाणी घालत इ निविदा प्रक्रिया टेंडर नोटीस वर्तमानपत्रात जाहीर केली हे अत्यंत खेदजनक आहे. त्यामुळे सरकार कोणाचेही असले तर आम्ही शांत बसणार नसल्याचे सांगून जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांनी या बैठकीसाठी एकत्र येऊन हक्काच्या पाण्यासाठी लढा उभारायचा आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group